तरूणांसाठी गुड न्यूज; स्टार्टअपसाठी सरकार देतयं ‘इतक्या’ लाखांपर्यंतचं लोन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | सध्या स्वत:चा पायावर उभं राहणं, स्वत:चा स्टार्टअप (startup) सुरु करणं तरुणाचं स्वप्न आहे. या वाढत्या स्पर्धेच्या जगात तरुणांना स्वत:चा बिझनेस करण योग्य वाटतं. त्यामुळेच अशा तरुणांना प्रोत्साहन देण्याचा काम केंद्र सरकार योजनेर्तंगत करत आहे.

त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana). या योजनेतंर्गत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांनी कर्ज परतफेड करताना तत्परता दाखवल्याचं दिसून आलं आहे. या योजनेअंतर्गत सात वर्षात सरकारने 20.9 लाख करोड रुपयांचे लोन सरकारने वाटप केले आहे.

या योजनेअंतर्गत तुम्हाला लवकरच कर्ज मिळेल आणि यावर लागणार व्याज देखील अंत्यत कमी आहे. तुम्ही सातत्याने किंवा योग्य पद्धतीने कर्जफेड (debt repayment) करत राहिलात तर तुमचं व्याज देखील कमी होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या मुद्रा योजनेला तीन भागात विभागण्यात आलं आहे.

शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन असे तीन भाग करण्यात आले आहेत. या तीन भागतील घेण्यात येणारी रक्कम वेगवेगळी आहे. शिशु लोन अंतर्गत तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज (loan) घेेऊ शकता. मुद्रा योजना किशोर लोन अंतर्गत तुम्ही 50 हजारच्या पुढे 5 लाखापर्यंत लोन घेऊ शकता. पाच लाखांच्या पुढे 10 लाख रुपयांच कर्ज तुम्ही मुद्रा योजनेच्या तरुण लोन अंतर्गत घेऊ शकता.

तुम्ही जर पीएम शिशु ऋण योजनांअतर्गंत कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही जामीनदाराची (Surety) गरज भासणारा नाही. प्रत्येक बँकेनुसार यासाठी लागणार व्याजदर वेगवेगळा असू शकतो. या योजनेअर्तंगत लागणार व्याजदर 9 ते 12 टक्के इतका असणार आहे.

या योजनेेतर्गंत लहान दुकानदार, फळे अन्न प्रक्रिया युनिट यासारख्या छोट्या उद्याोगांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला पॅनकार्ड, आधारकार्ड, रेसिडेन्शीयल प्रुफ (Residential Proof), पासपोर्ट साईज फोटो आणि बिझनेस कार्डची आवश्यकता पडू शकते.

महत्त्वाच्या बातम्या