बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार’; नवाब मलिकांचा खबळजनक दावा

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे नेहमीच कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेले पहायला मिळतात. मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणापासून (Mumbai Drugs Case) ते रोज काही ना काही गौप्यस्फोट करत असतात. त्यामुळे मलिक यांनी एकादं ट्विट (Tweet) जरी केलं तरी खळबळ उडालेली पहायला मिळते.

नवाब मलिक यांनी काल एक ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनं सध्या राज्यभर खळबळ उडालेली पहायला मिळत आहे. काल केलेल्या या ट्विटमधून ‘उद्या सकाळी काही सरकारी पाहुणे माझ्या घरी येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे.

माझ्या माहितीप्रमाणे काही सरकारी पाहुणे माझ्या घरी सकाळी सकाळी येणार आहेत. मी त्यांचे चहा आणि बिस्किटाने मनापासून स्वागत करण्यास तयार आहे. त्यांना योग्य पत्ता हवा असल्यास ते मला कॉल करू शकतात, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनं एकच खळबळ पहायला मिळत आहे.

दरम्यान, यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. माध्यामांमध्ये चुकीच्या पोस्ट टाकून बदनाम केल्याचा कट रचल्याचा आरोप यास्मिन यांनी मलिक यांच्यावर केला आहे. त्यामुळे सध्या नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

चिंताजनक! Omicron संदर्भात एम्सनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पक्ष या देशात ठेवायचा की नाही…”

‘पालक म्हणून आम्ही आमच्या मुलीला…’; अनुष्का शर्माची पोस्ट व्हायरल

“मी नुसत्या बढाया मारत नाही, शिवसेनेचा धुव्वा उडवणारच”

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी मागितली माफी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More