महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासाठी राजकीय हलचालींना वेग; उद्या सर्वपक्षीय बैठक

मुंबई | मराठा आंदोलन पेट घेत असताना मराठा आरक्षणासाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. शनिवारी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी विधानभवनात विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. 

मराठा आरक्षणासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या ‘सेवासदन’ निवासस्थानी भाजपची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, रणजित पाटील, बबनराव लोणीकर उपस्थित होते.

दरम्यान, मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व संघटनांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. त्यासोबत त्यांना चर्चेलाही बोलावणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

-मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा

-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या