बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून करा”

कोल्हापूर| गेल्या काही दिवसांपासून ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊसाला देण्यात येणाऱ्या एफआरपीचे तुकडे केल्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. कोल्हापूरमधील जयसिंगपूर याठिकाणी विसाव्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते.

दसऱ्याला शिमगा करणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांचं दिवाळीला काळे झेंडे घेऊन स्वागत करा असं, आवाहन शेतकऱ्यांना करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे नेते तुमच्या गावात दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला येतील. काळे झेंडे दाखवून त्यांच स्वागत करा ऐवढीच विनंती आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर साताऱ्याच्या सभेवरून निशाणा साधला आहे. शरद पवार साताऱ्याच्या सभेत भिजत- भिजत बोलले की हे राज्य आम्ही शेतकऱ्यांसाठी बदलतो आहे. तुमचेच शब्द तुम्हाला आठवण करून द्यावे म्हणून तुम्हाला आठवण करून दिली, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठवाडा, पश्चिम विदर्भात परतीच्या मान्सूनमध्ये प्रचंड हानी झाली. कापूस, भुईमुग,उडीद, तुर आणि मुग पाण्यात बुडाल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. जिरायत शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही त्यांची वर्षाची जगायची जिंदगी होती. ती सगळी पाण्यात वाहून गेली.त्यांच्या वाट्याला उपेक्षाचं आली. जर खरोखरचं सरकारकडे पैसे नव्हते तर सरकारी कर्मचाऱ्यांना रोखीने 11 टक्के महागाई भत्ता कसा दिला, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

“राहुल गांधींना ड्रॅग्जचं व्यसन, ते ड्रॅग्ज तस्करी देखील करतात”

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच बंड! म्हणतो, “माझ्यासाठी ती खासगी गोष्ट, मी सांगणारच नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More