‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र सरकारची नवी सुधारीत नियमावली जाहीर, वाचा सविस्तर
मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केल्यानंतर त्यासंबंधीची नियमावली जाहीर करण्यात आली आणि त्यातून अत्यावश्यक घटकांना सूट देण्यात आली होती. परंतु यासंदर्भात ‘ब्रेक दि चेन’ ही मोहीम राबवत असताना राज्य सरकारने काल एक सुधारित नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये आणखी काही आवश्यक सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन सुधारित आदेशानुसार आता पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादन यांसह सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, आयटी विभागातील सर्वर रूम आणि ऑपरेटर, शासकीय व खाजगी सुरक्षा संदर्भातील सेवा तसेच फळ विक्रेते यांचा समावेश आवश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे.
‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत नागरिकांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी सरकार विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काही खाजगी आस्थापना व कार्यालयांना सुरू ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. स्टॉक मार्केट डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील सर्व संस्था, प्राथमिक डिलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स तसेच सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळ, सर्व मायक्रो फायनान्स संस्था व वकिलांची कार्यालये यांना सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुधारित आदेशानुसार आपली कार्यालयं सुरू ठेवण्यास राज्य सरकारतर्फे परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींचं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत दर पंधरा दिवसांनी संबंधित कर्मचाऱ्याला RTPCR चाचणी करून कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र जवळ बाळगणं 10 एप्रिलपासून बंधनकारक असणार आहे. प्रमाणपत्र जवळ न बाळगल्यास एक हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात येणार आहे.
जे नागरिक बाहेर गावावरून प्रवास करून रात्री 8 ते सकाळी 7 या संचारबंदी कालावधीदरम्यान बस, विमान अथवा रेल्वेने येतील किंवा ज्यांना प्रवासासाठी जायचं असेल, अशा नागरिकांसाठी संचारबंदी काळात मुभा देण्यात आली आहे त्याबरोबरच त्यांना आपलं प्रवासाचं वैध टिकीट जवळ बाळगणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांनाही रात्री 8 नंतर घरी प्रवास करायचा असल्यास जवळ हॉलतिकीट बाळगून त्यांना प्रवास करता येणार आहे.
Guidelines for containment & management of COVID-19 #BreakTheChain pic.twitter.com/jVISqUZVQL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 5, 2021
थोडक्यात बातम्या –
दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी
अनिल देशमुख नवी दिल्लीत दाखल, ‘या’ बड्या लोकांना भेटल्याची माहिती
“साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्याचा पराभव निश्चित आहे”
सचिन वाझेच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; NIA च्या ताब्यात ‘ती’ स्पोर्टस बाईक
…तर सरकारमधील अर्धा डझन मंत्री घरी जातील; ‘या’ भाजप नेत्याचा दावा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.