बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाचं(st corporation)  राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. अनेक दिवस झाले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारला तोडगा काढता येत नव्हता. मात्र आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर दिली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब लवकरच बैठक घेणार आहेत.

अनिल परब (anil parab) यांनी या ऑफरबद्दल माहिती दिली आहे, ते म्हणाले, गेले अनेक दिवस एसटीचा संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. अनेक दिवस हा तिढा सुटत नव्हता. मात्र, काल एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासोबत बैठक झाली. पगार वेळेवर मिळावा आणि पगार वाढवावा ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे, असं परब म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, न्यायालयाने यासाठी एक समिती बनवली आहे. 12 आठवड्यात मुख्यमंत्र्यांना याबाबत अहवाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री तो न्यायालयात सादर करतील. त्यानंतर न्यायालय (High court) जो निर्णय देईल, तो अंतिम असेल. समिती यासाठी काम करत आहेच. याला बराच वेळ जाणार आहे. तोपर्यंत हा संप असाच सुरु राहू नये म्हणून दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहोत. अंतरिम पगारवाढ हा देखील पर्याय आहे, असं परब यावेळी म्हणाले.

अनिल परब यांनी आज गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या (St employee) प्रश्नांवर चर्चा केली. परब यांनी संपावर पर्याय काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर दिली आहे. आज पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. त्यानंतर अंतरिम पगारवाढीबाबत निर्णय होणार आहे. तर सरकारची ही ऑफर कर्मचारी मान्य करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

“नरेंद्र मोदी सहजासहजी माघार घेणार नाहीत, त्यांनी माफी मागितली म्हणजे…”

अमाप रिटर्न्स देणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचं काय होणार?, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

वीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More