महाराष्ट्र मुंबई

सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड

मुंबई | महाराष्ट्र सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे आणि त्यामुळेच आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहे.

सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही.

महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितलं आहे.

सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून नवरदेवाने रागाच्या भरात केलं नवरीच्या बहिणीचं अपहरण!

“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, त्यांचा कोणी हातही धरु शकत नाही”

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!

कोरोना लसीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती

“कृषी कायद्यात बदल करायला तयार, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या