मुंबई | सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा केव्हा सुरु होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान याच मुद्द्यावर राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देण्याच्या विचारात आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 15 डिसेंबरपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
दिवाळीनंतर लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं होतं. इक्बाल सिंह चहल म्हणाले,” इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढलीये. त्यामुळे सध्या दोन आठवडे कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांच्या संख्येवर लक्ष दिलं जाणारे. त्यानंतर 15 डिसेंबरच्या पुढे लोकल ट्रेनबाबत निर्णय घेतला जाईल.”
“मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केलीये. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्याचप्रमाणे पालिकेचंही नियोजन सुरु आहे,” असंही चहल यांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नावं
“सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही”
“योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली”
‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे हरियाणाचे मनोहरलाल खट्टर यांचे सरकार अडचणीत