बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात दररोज 15 लाख लोकांचं लसीकरण करण्याची सरकारची तयारी”

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असतानाच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच देशात सर्वाधिक लसीकरण पूर्ण केलेलं राज्य म्हणून नुकतच महाराष्ट्र राज्य घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील लसीकरणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून समर्पित कोविड रुग्णालय उभारलं आहे. त्याच्या हस्तांतरण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारची दररोज 15 लाख लोकांची लसीकरण करण्याची तयारी असल्याचं बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली होती. पण आता कोरोनाचा नवा विषाणू महाराष्ट्रात डोकं वर काढत असताना पाहायला मिळत असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालाड येथील रूग्णालय हस्तांतरण प्रसंगी बोलताना म्हटलं की, आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. तसेच सरकारची दररोज 15 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाचा वेग असाच राहिला तर महाराष्ट्रात लवकरच सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! 10 मिनिटांच्या अंतरात नर्सनं महिलेला दिले चक्क 3 लसीचे डोस

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेची समज नाही, म्हणून ‘कर्जाचे डोस’ देऊन काम चालू आहे”

“महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल”

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More