कर्जमाफीचे पितळ उघडे पडण्याची सरकारला भीती!

अहमदनगर | महाराष्ट्रात 89 लाख शेतकऱ्यांना 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याची आवई पिटणाऱ्या सरकारने पिटली, मात्र त्यांनी आता तालुका-जिल्हानिहाय कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलीय. 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात श्रीगोंदा झाली, त्यावेळी ते बोलत होते. 

कर्जमाफीचे आपले पितळ उघडे पडेल म्हणून हे सरकार शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर करत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीचे सर्वच बडे नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या