बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचं वीज बिल शासनाने माफ करावं- रामदास आठवले

मुंबई | लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावं. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीज बिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील निम्मी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनीने माफ करावं, तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही वीज कापू नये, अशी सूचना रामदास आठवले यांनी वीज कंपन्यांना केली आहे.

मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने 18 टक्के वीजबिल माफ केलं आहे. मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचं आपण त्यांना आवाहन केलं असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करत असून मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांना ‘येवले अमृततुल्य’तर्फे तरतरी देण्याचं काम

“धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा”

महत्वाच्या बातम्या-

टाळ्या वाजवून, दिवे लावून कोरोनाचं संकट दूर होणार नाही- राहुल गांधी

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम”

1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More