“सरकारने शालूच्या फोटोंवरील कमेंट्सवर लाॅकडाऊन लावावा”
मुंबई | फँड्री चित्रपटातील शालूने सोशल मीडियावर प्रचंड आग लावली आहे. मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हीने काम केलेल्या फँड्री चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे हे आहे. सोशल मीडियावरचे शालूचे जब्बर फोटो पाहून आता शालूच्या फोटोंवरील मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तसेच फेसबुकवर फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो. राजेश्वरीने फोटो शेअर करताच त्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा पाऊस पडतो. तिच्या प्रत्येक फोटोवर हजारोच्या संख्येने कमेंट्स असतात. अशातच सरकारने सर्वात आधी फँड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते’ असे मीम सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
राजेश्वरी खरातच्या फोटोवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. चाहते आपल्या लाडक्या शालूचे फोटोही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वॉलवर शेअर करतात. त्यामुळे तिच्या फोटोवरील कमेंटमधल्या ‘शेरां’सोबत सव्वाशेरांनी केलेल्या शेअर्सची संख्याही सव्वाशेच्या घरात जाते.
दरम्यान, व्हायरल होणाऱ्या शालूच्या मीम्सवर आता शालू उर्फ राजेश्वरी खरात प्रतिक्रीया देणार का? याकडेही चाहत्यांचं लक्ष आहे. तसेच शालू आता कोणता नवीन जलवा करेल याकडे देखील सगळ्याचं लक्ष आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू! मंदिरातून येताना दोन मुलींसोबत झालं मन हेलावून टाकणारं कृत्य
मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचारामुळे संतापलेल्या बापाने थेट आरोपीचं घर गाठलं अन्…
मंदिरातील मूर्त्या तोडणाऱ्याला पोलिसांनी पकडलं, त्याने सांगितलेलं कारण ऐकुन पोलिसही चक्रावले
पुण्यातील तरुणीशी आधी इन्स्टाग्रामवर ओळख, त्यानंतर तिच्याच घरात घुसून केलं संतापजनक कृत्य
खळबळजनक! कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह
Comments are closed.