बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

14 एप्रिलनंतर ग्रामीण भागातली टाळेबंदी सरकारने उठवावी- राजू शेट्टी

कोल्हापूर | 4 एप्रिलला देशातली टाळेबंदी संपल्यानंतर महानगरं आणि काही बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावं, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

टाळेबंदीचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते आणि वास्तव हे वेगळं आहे, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

ग्रामीण भागात 14 एप्रिलनंतर सरकारने टाळेबंदी उठवावी अशी आमची मागणी आहे. कारण खेड्यांमध्ये कोरोनाचा फार प्रसार झालेला नाही. गावाकडची माणसं जी मुंबई आणि पुण्यात वास्तव्य करत होती ती ज्यावेळी आपल्या गावी परतली तेव्हा त्यांना सक्तीचे क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक यांसारखे बाधित भाग सोडले तर महाराष्ट्रात इतरत्र लॉकाउनचे निर्बंध 14 एप्रिलनंतर उठवण्यात यावेत अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कौतुकास्पद! पठाण बंधूंनी गरजू व्यक्तींसाठी दान केलं 10 हजार किलो तांदूळ

“बेरोजगारी वाढण्याचं संकट मोठं, येत्या काळात तज्ज्ञ-जाणकार लोकांशी बोलून उपाययोजनांची चर्चा करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More