मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या संदर्भात मराठा समाजातील तरूण आक्रमक झाले होते. त्यांना आता दिलासा मिळणार आहे.
निवडणूक आयोगाने अध्यादेश काढायला राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यामुळे अध्यादेश काढायला आता कुठलीही अडचण राहिली नाही, असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
उद्या राज्य मंत्रीमंडळांची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत हा अध्यादेश काढला जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशाने विद्यार्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-शरद पवारांनंतर कन्या सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर
-चाहत्यांचे प्रेम पाहून वॉट्सन भावूक; दिला ‘हा’ खास संदेश
-बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत; भाजप त्यांची बदानामी करतंय- सुप्रिया सुळे
-लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मी विचार करत नाही- विराट कोहली
Comments are closed.