मुंबई | EWS मध्ये 10 टक्क्यात मराठा समाजाला समाविष्ट करणार नाही असा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला आहे, असं राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं.
खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक संपली. EWS आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, तसंच मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
EWSमध्ये आम्हाला तात्पुरतं आरक्षण नको, असं सांगत त्याचे तोटे आम्ही सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मराठा समाजाला EWS मध्ये न टाकण्याचे तात्काळ आदेश दिलेत, असं संभाजीराजेंनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
वायनरीत आला वाईनचा महापूर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘…त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?’; चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा
आयपीलमध्ये ऑरेंज आर्मीचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात
‘…पण याचा अर्थ तुम्ही तिचं घर पाडावं असा आहे का?’; उच्च न्यायालयानं बीएमसीला फटकारलं