महाराष्ट्र मुंबई

2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे

मुुंबई | पुढील 2 दिवसात सरकार मराठा आरक्षणासंदर्भात योग्य हालचाली करेल, असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. 

मराठा आंदोलन चिघळण्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली. भेटीत मराठा आंदोलन आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. 

दरम्यान, मराठा आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी यात हस्तक्षेप करावा. मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात

-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या