बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर महिन्याला 5000 रूपये पेंशन मिळेल’; सरकारची भन्नाट योजना

नवी दिल्ली | म्हातारपणात सगळ्यानांचा आधार हवा असतो. आरामात बसून सुखी जीवनाचा शेवटचा टप्पा जगावा अशी अनेक जेष्ठांची इच्छा असते. असा काळ जिथे तुम्हाला पैशाची काळजी करावी लागू नये, असं प्रत्येकाला वाटत असतं. तुमची ही इच्छा आता पंतप्रधानाच्या या योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. सरकारच्या अटल पेन्शन योजनेमुळे (Atal Pension Scheme) तुम्हाला म्हातारपणात लाभ होऊ शकतो. आतापर्यत 99 लाख लोकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.

9 मे 2015 ला या योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. 18-40 वयोगटातील लोक सुद्धा यांचा लाभ घेऊ शकतात. APY योजनेअंतर्गत ठेवीदारांना 60 वर्षानंतर पेन्शन (Pension) मिळू लागते. मात्र त्यातील गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. यामध्ये तुम्हाला किमान 1000 तर कमाल 5000 रू इतकी पेंशन मिळू शकते.

18 वर्षांचे असताना जर तुम्ही यात गुंतवणूक केल्यास वयाच्या साठीपर्यंत तुम्हाला 5000 रू इतकी पेन्शन मिळू शकते. यासाठी तुम्हाल महिन्याला फक्त 210 रू जमा करावे लागतील. तुम्हाला जर 1000 रू इतकी पेन्शन हवी असेल तर तुम्हाला महिन्याला 48 रु भरावे लागतील. 2000 रू पेन्शन साठी 84 तर 3000 रू पेऩ्शन साठी 126 रू भरावे लागतील. या पद्धतीने तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.

केंद्रात मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून अनेक योजना त्यांना आणल्या आहेत. या योजनांमुळे गोरगरिबांचा खूप फायदा झाला आहे. प्रधानमंत्री जन धन योजना, सबसिडी, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या अनेक योजनांचा फायदा नागरिकांना झाला आहे.

थोडक्यात बातम्या

कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

e-Aadhar संदर्भात ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”

मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More