बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; अनिल परब यांची घोषणा

मुंबई | गत 15 दिवसांपासून राज्याच्या वाहतूकीचा भार वाहणारी एसटी आगारात धुळखात उभी आहे. एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. अशातच सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळामध्ये विविध मागण्यांसाठी चर्चासुद्धा झाली. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनं परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केली आहे.

मुळ पगारात वाढ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जे कर्मचारी 1 वर्ष ते 10 वर्ष कर्मचारी आहेत. त्यांच्या मुळ पगारात 5 हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या इतिहासातील ही मोठी वाढ असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

जे कर्मचारी 10 ते 20 वर्षाचे कर्मचारी आहेत, त्यांना 4 हजार रूपये वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 वर्षांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यांच्या वेतनमध्ये 2500 रूपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दरम्यान, एसटीच्या स्थापनेपासून एसटीची एवढी बिकट अवस्था कधीच झाली नसल्याचं खुद्द राजकीय नेते मान्य करत आहेत. राज्याच्या वाहतूकीच्या दृष्टीनं एसटी चालू रहाणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. परिणामी आता सरकारच्या या घोषनेनंतर कर्मचारी संप मागं घेणार का हे पहाणं महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या 

23 वर्षीय तरुणीचा 14 वर्षाच्या मुलावर बलात्कार, तर बहिणीवर प्रियकराचे अत्याचार

“राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाव्यात अशी तरुणांची अपेक्षा”

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा, एकाला थेट गोळी घातली, पाहा व्हिडीओ-

पत्नीच्या खुलास्यानं सोलापूर हादरलं, अश्लील व्हिडीओ पाहून पती…

कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी?, ‘या’ दोन नावांची चर्चा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More