बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

OBC Reservation: हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

मुंबई | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून आरक्षण या एकाच मुद्द्यावर सरकारला प्रचंड विरोधाचा आणि टीकेचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे सराकारनं दिलेलं ओबीसींच राजकीय आरक्षण स्थगित केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात आली. परिणामी आता सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी महत्त्वाचा असणारा इम्पेरिकल डाटा गोळा करण्यावरून राजकारण पेटलं आहे. सरकार आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच राज्य हिवाळी अधिवेशनात सरकारनं ओबीसी समाजाच्या दृष्टीनं मोठी घोषणा केली आहे. ओबीसी आयोगाला मजबूत करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगास समर्पित आयोग म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी, इम्पेरिकल डाटा‌ गोळा करण्यासाठी राज्य सरकारने आयोगासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 435 कोटींची तरतूद केली आहे. या कामासाठी 5 कोटींचा निधी आधीच देण्यात आला होता. आता पुढील वर्षासाठी आणखी 430 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळं विरोधकांनी सभागृहात सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीची घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“भाजपला लाज वाटली पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी”

भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा! आशिया कप स्पर्धेत पटकावलं कांस्य पदक

“हे बालिशपणाचं लक्षण, आपला बाप आजारी असताना…”, आव्हाड संतापले

“पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसदेत नसतात, त्यामुळे त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या”

“राज्य नेमकं कोण चालवतंय?, रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार हे…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More