बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | पेट्रोल डिझेलचे वाढते भाव ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावेत, अशी देशभरातून मागणी केली जात आहे.

जनतेची हीच मागणी लक्षात घेऊन आता भारत सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या तयारीत दिसत आहे. नुकतंच पेट्रोल मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

भारत सरकार लवकरच एक असा गट तयार करणार आहे, ज्या गटात सर्व सरकारी आणि खासगी रिफायनरी कंपन्या एकत्र आणल्या जाणार आहेत. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर चांगल्या सौद्याची मागणी करता येणार आहे.

दरम्यान, भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेलाची आयात करणारा देश आहे. भारत एकूण गरजेच्या 85 टक्के तेलाची इतर देशांकडून आयात करत असतो. या 85 टक्क्यांपैकी बहुतेक तेल हे मध्य पूर्व तेल उत्पादक देशांकडून खरेदी केले जाते.

थोडक्यात बातम्या –

विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात मिळाले संकेत

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

सोन्याच्या दरात 580 रुपयांची घट तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

IRCTCच्या स्टॉकमध्ये एवढी मोठी घसरण का? एक्सपर्ट म्हणतात…

मोठी बातमी! प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये अटक; कलम 144 लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More