Top News देश

“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”

नवी दिल्ली | राहुल गांधीनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचं सरकार असलेल्या पंजाब आणि राजस्थानमधील बलात्कारांच्या घटनांवर राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधीनी यासंदर्भात ट्विट केलंय. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही. तसंच कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात नाहीत आणि न्यायाचा मार्ग रोखतंही नाहीत. पंजाब आणि राजस्थानातल्या पीडितांना न्याय मिळत नसेल तर मी तिथेही जाणार.”

पंजाबच्या होशियारपूरमध्ये 6 वर्षांच्या दलित मुलीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश यांनी राहुल गांधींवर राजकीय सभा घेण्यापेक्षा पीडित कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती अशी टीका केली होती.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी होशियारपूर आणि हाथरसमधील घटना अतिशय वेगळ्या असल्याचं म्हटलं आहे. पंजाब पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींना अटक केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसेंचं ‘ते’ वक्तव्य पटण्यासारखं नाही- रावसाहेब दानवे

“तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या मदतीने लालूू यादव यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला”

योग्य काळजी घेऊन एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- उद्धव ठाकरे

फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या