“सरकार बोलतं कमी आणि डोलवतं जास्त”

“सरकार बोलतं कमी आणि डोलवतं जास्त”

मुंबई |बोलणं कमी आणि डोलणं जास्त असाच विद्यमान सरकारचा कारभार आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाची पुंगी वाजवून सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपासून डोलावलं आणि टोलावलं जात आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

‘खिशात नाही आणा …’ हा कारभार आता पुरे झाला, अशी सामना संपादकीयमधून त्यांनी टीका केली आहे.

सातव्या वेतन आयोगावरुन त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता श्रीपाद छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल

-“दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा, पंतप्रधान मोदीही रस्ता बदलतात”

-कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं

“मागच्या वेळी भाजपसाठी टेबल लावले, आता वाट लावणार”

-“इंग्रजांच्या काळापासून मराठ्यांना आरक्षण,पण काँग्रेसनं ते काढून घेतलं”

Google+ Linkedin