बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली?, राजकीय वर्तुळात एकच चर्चा

मुंबई | विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीनं जी नावं दिली आहेत, त्या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. राज्याच्या राजकारणात सध्या हा मुद्दा चांगलाच गाजत असलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती होती, मात्र गुरुवारी ही भेटच न झाल्याने राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना भेट नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राज्यपालांनी भेट नाकारली असा स्पष्ट आरोपच केला आहे, त्यांच्या या खुलाशाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राजभवनाने मात्र वेगळंच स्पष्टीकरणं दिलंय. अशा कुठल्याही भेटीसाठी वेळ घेण्यात आलेली नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राज्यपालांची वेळ घेण्यासाठी राजभवनावर गेले होते, मात्र माझे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. शिष्टमंडळ येणार असल्याची पू्र्वकल्पना दिलेली नव्हती. लगेच वेळ देता येणे शक्य नाही, असं राज्यपालांनी त्यांना सांगितल्याच्या बातम्या आल्या आहेत. याबाबतच्या बातम्यांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे.

दरम्यान, राज्यपाल आता तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यामुळे राज्यपालांची लगेच भेट होणं शक्य दिसत नाही. या मुद्द्यावर मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला राज्यपालांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. आता 1 सप्टेंबरनंतरच ही भेट होऊ शकते, अशी माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

“आपल्याला धनुष्यबाणाचा विसर पडलेला पाहून फार वेदना होतात”

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, सपना चौधरीनंतर ‘या’ डान्सरची वाढतेय क्रेझ!

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर… ‘या’ नेत्यांचा झाला समावेश

अवघ्या 30 वर्षाच्या तरुणीचा ‘टीम नाना पटोले’मध्ये समावेश, पाहा कोण आहे ती?

मोठी खलबतं… अखेर पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More