महाराष्ट्र वर्धा

…तर स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा, आत्मनिर्भर भारत हे बापूंचं स्वप्न साकार होईल- भगतसिंग कोश्यारी

वर्धा | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. भगतसिंग कोश्यारी यांनी सामूहिक प्रार्थना देखील केली. त्यांची ही भेट खासगी असल्याचं सांगण्यात आलंय.

सेवाग्राम आश्रमात आल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रमातील विविध उपक्रमांना भेट दिली. बापू कुटीमध्ये प्रार्थना केली, तसेच आश्रमातील खादी युनिटमधून 9 मीटर खादी खरेदी करत 1620 रुपये सुद्धा दिले. आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांच्याशी चर्चा केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे विचार आजही प्रेरणादायक आहे. मात्र, त्यांचे विचार जपणारे कमी आहेत, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रम प्रतिष्ठानकडे व्यक्त केली असल्याची माहिती आश्रमाचे अध्यक्ष प्रभू यांनी दिली.

येथे आल्यावर सादगी, शांती आणि स्वात्मनिर्भरतेचा आभास होतो. येथे अधिकाधिक युवाशक्ती पोहोचली तर स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा तथा आत्मनिर्भर भारत हे बापूंचं स्वप्न साकार होईल, असं भगतसिंग कोश्यारी यांनी अभिप्रायात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! आरोग्याची चौकशी करणाऱ्या परिचारिकेला ग्रामपंचायतीसमोर चाबकाने मारहाण

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रुग्ण!

राज्यात आज 9431 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

पुणे शहरासह जिल्ह्यात वाढली गुन्हेगारी; गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांना दिला ‘हा’ आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या