बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रग्स प्रकरणावर राज्यपाल कोश्यारीचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या अन्य आठ जणांना एनसीबीने अटक केलेली आहे. तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राज्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं नाट्य पहायला मिळत आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता या कथित ड्रग्स प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मोठी चर्चा होताना पहायला मिळत आहे. नवीन पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढलं पाहिजे. त्यासाठी जे आवश्यक उपाय आहेत, ते करण्याची गरज आहे, असं वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.

डिसमॅलटिंग कॉस्टिजम लेसन्स फ्रॉम्स सावरकर्स इसेनशयल्स ऑफ हिंदुत्व या विषयावरील चर्चा सत्राच्या उद्घाटन सोहळ्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. कोश्यारी आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील एका सत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्स आणि वसूलीवरून राज्यात खडाजंगी होताना पहायला मिळत आहे. त्यातच आता भगतसिंग कोश्यारी यांनी तरूण पिढीला महत्वाचा सल्ला दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; वाचा चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

लेकाची कामगिरी पाहून बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव अन् सांगलीत टीव्ही फोडला; पाहा व्हिडीओ

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More