‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
औरंगाबाद | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महारांचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं आहे.
चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्शांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे. मी शिवाजी किंवा चंद्रगुप्ताला लहान दाखवत नाही. आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान आहे. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे, असं देखील राज्यपाल म्हणाले.
गुरूदक्षिणा म्हणून राज्याची चावी तुम्हाला देत असल्याचं महाराज समर्थांना म्हणाले. मात्र, समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं, असं वक्तव्य राज्यपालांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत पुण्यात आंदोलनाला सुरूवात केली आहे. राज्यपालांचा वक्तव्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”
“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन”
‘आमरण उपोषण मागे घेणार नाही’; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं….
“अमित शहांना जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला तेव्हा आम्ही असेच आरोप केले होते का?”
“चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात हे कायम लक्षाच ठेवा”
Comments are closed.