मुंबई | कोरोनाच्या संसर्गामुळे सध्याचा काळ विद्यार्थी, शिक्षक व पालक सर्वांसाठीच कठीण झाला आहे. या परिस्थीतीत विज्ञान व गणित यांसारखे कठीण समजल्या जाणाऱ्या विषयांची भिती विद्यार्थ्यांमधून घालवा, त्या विषयांचा अभ्यास कसा करवा त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिक्षकांना दिल्या आहेत.
पुणे येथील सुपरमाईंड फाउंडेशन या संस्थेने राज्यातील दहावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी ‘गणित, विज्ञान या विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत’ या विषयावर एका दूरस्थ परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यावेळी परिसंवादाचे राजभवन येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलते होते.
सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. सगळ्या विषयांत चांगली प्रगती करायची असेल, तर त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला.
तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साधने नाहीत अशांपर्यंत देखील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या-
काही राजकीय पक्षांना ऊत आलाय, गर्दी जमवून आंदोलन करणं टाळा- किशोरी पेडणेकर
“ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”
…तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे भोसले
“शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला”
पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी- संजय राऊत