बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये!, पत्र लिहून मागवली ‘ही’ मोठी माहिती

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यात राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर जीआर मंजुर करुन घेतले, अशी माहिती समोर आली आहे. हे अध्यादेश गेल्या काही दिवसांत मंजुर केल्याचं समजतंय. राज्य सरकारने जीआर मंजूर करण्याचा सपाटाच लावला आहे. भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी राज्यपालांना पत्र लिहून या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तीन दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या जीआरबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. राज्यपालांनी याविषयी मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. सरकारकडून तीन दिवसांत मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी मागवली आहे. 22 जून ते 24 जून दरम्यानच्या काळात एवढे जीआर कसे मंजूर करण्यात आले, त्याविषयी सविस्तर अहवाल राज्यपालांनी मागवला आहे. आता राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना या जीआरबाबत काय माहिती देतात, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

महाविकास आघाडी सरकारने 5 दिवसांत 280 जीआर संमत केले. राज्यातील अस्थिर परिस्थिती आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबाबत आणि जारी होत असलेल्या जीआरबाबत विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. मुख्यमंत्रीपद अस्थिर झाल्यानंतर कधी नव्हे इतके महाविकास आघाडी सरकार निर्णय घ्यायला लागले असून 48 तासांत 160 पेक्षा जास्त जीआर जारी करण्यात आले आहेत.

विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढवणारा आहे. अडीच वर्षात निर्णयशून्य असलेले महाविकास आघाडी सरकार कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावना मान्य करत आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी दरेकरांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

थोडक्यात बातम्या –

शिवसैनिकांचा संजय राठोडांना जोर का झटका, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुलाशी मैत्री केली म्हणजे मुलीची शारीरिक संबंधांना परवानगी समजू नये- उच्च न्यायालय

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा!

पत्रकारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, ‘या’ पत्रकाराला अटक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More