बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काश्मीरचे राज्यपाल दारू ढोसत बसतात त्यांना काहीच काम नसतं- राज्यपाल

मुंबई | काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते काहीच काम करत नाहीत. तिथले राज्यपाल तर नेहमी दारु ढोसत असतात आणि गोल्फ खेळत असतात, असं वादग्रस्त वक्तव्य गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे ते एका कार्यक्रमात बोलत होते.

मी काश्मीरमधून आलो आहे. तिथली जागा खूपच अडचणीची जागा म्हणून ओळखली जाते. मात्र मी या अडचणींवर यशस्वीरित्या मात केली. तिथले सर्व प्रकारचे प्रश्न हाताळले, असल्याचं मलिक यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेताना म्हटलं होतं.

जर तुम्हाला कोणाला ठार करायचंच असेल तर तुम्ही भ्रष्ट लोकांना का ठार करीत नाही?, ज्यांनी देशाला आणि काश्मीरला मोठ्या काळापासूनं लुटलं आहे. त्यांच्यापैकी कधी कोणाचा मृत्यू झाला आहे का?,. असं वादग्रस्त वक्तव्य मलिक यांनी केलं होतं.

दरम्यान, सत्यपाल मलिक हे भाजपचे माजी नेते असून 2018-19 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. सन 2017 मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मलिक यांच्यावर बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 

ट्रेंडिंग बातम्या-

बुॉद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद कोरोनामुळं जर्मनीत अडकला

मागची पाच वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील

महत्वाच्या बातम्या-

“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”

शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा- चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या भीतीने महाराणीने सोडला आलिशान महाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More