बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज्यपालांनी दिलेले ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट

मुंबई | भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील उडी नंतर आता राजकारण चांगलंच पेटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी देण्यासाठी पत्र दिले आहे. त्यानुसार राज्यपालांनी 30 जूनला विशेष अधिवेशन बोलावले असून त्यात महाविकास आघाडी सरकार बहुमत चाचणी (Floor Test) देणार आहे.

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती अस्थिरर असल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या एकूण 39 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त माध्यामांमध्ये प्रसिद्ध होते आहे. तसेच 7 अपक्ष आमदारांचा 28 जून रोजी राजभवनाला ईमेल आला आहे. त्यामध्ये सरकार अल्पमतात आल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहुमत चाचणी सिद्ध करणे अपेक्षीत आहे, असं राज्यपालांनी मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.

विधानसभेचे विशेष अधिवेशन 30 जून रोजी सकाळी 11 वाजता सुरु होईल. त्यामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागेल. काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विधानसभा परीसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण होईल. प्रत्येक सदस्याला जागेवर उभे रहाण्यास सांगून सदस्य मोजणी करावी, अशा काही स्पष्ट सूचना राज्यपालांच्या कार्यालयातून आल्या आहेत.

30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारचे भविष्य ठरणार आहे. शिंदे गटाने अद्याप विलीनीकरणाचा कोणताही निर्णय घेतला नसून त्यांच्या निर्णयाची सगळे वाट पहात आहेत.

थोडक्यात बातम्या –

“संजय राऊत कालही महत्वाचे नव्हते आजही नाहीत, आता…”

“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”

भाजपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, म्हणाले…

ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, 30 तारखेला सरकारची बहुमत चाचणी

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More