भंडारा महाराष्ट्र

भंडारा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्यपालांकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत!

भंडारा | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली.

आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देवून बाळांच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितलं.

आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी दिले.

थोडक्यात बातम्या-

सत्यता पडताळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल- दत्तात्रय भरणे

…यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होतं- हेमा मालिनी

“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”

ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला एनसीबीकडून समन्स

गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही तर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या