बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली ‘ही’ आठवण

मुंबई | 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. त्यानंतर हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक आठवण करून दिली आहे.

येत्या 5 दिवसात पावसाळी अधिवेशन येऊ घातलं असताना अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल कोश्यारी यांनी सरकारला आठवण करून दिली आहे. महाविकास आघाडीच्या खाते वाटपानुसार विधानसभा अध्यक्षपद सध्या काँग्रेसच्या खात्यात आहे.

मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडलं होतं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद पद रिक्त आहे. त्यावर लवकर निर्णय घेण्याची गरज असल्यानं त्यांनी हे पत्र पाठवल्याचं सांगितलं जातंय. पत्र पाठवून त्यांनी ठाकरे सरकारला चिमटे काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता 12 आमदाराच्या नियुक्तीचा विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो.

दरम्यान, 2 दिवसांपुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. तर काल देवेंंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे येत्या अधिवेशनात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा रंगतदार सामना रंगण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

अँटीबाॅडी तयार न झाल्यानं अदर पुनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात न्यायालयात अर्ज

“काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती, आता काँग्रेसमधली विचारांची परंपरा संपत चाललीये”

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये आढळलं ‘हे’ नवीन गंभीर लक्षण

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More