जाता जाता राज्यपालांचा शिंदे गटाला धक्का; ‘या’ निर्णयाची जोरदार चर्चा

मुंबई | वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. भगतसिंह कोश्यारी यांना काल राजभवनात निरोप देण्यात आला. भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या पदावरून पायउतार होतानाही शिंदे गटाला ठेंगा दाखवला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची दहावी जागा रिक्त होती. या जागेवर राज्यपाल कोश्यारी यांनी भाजप गटातील व्यक्तीची वर्णी लावली आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या परिचयातील प्रभादेवीतली धनेश सावंत यांची राज्यपाल निर्देशित सिनेट सदस्यपदी वर्णी लागली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशाच्या नियुक्तीचे हे पत्र 3 फेब्रुवारी रोजीच निघालं आहे. राज्यपालांनी मुंबई विद्यापीठ नामनिर्देशित सदस्यांच्या 10 पैकी 9 जागांवर भाजपशी संबंधित सदस्यांची अलीकडेच वर्णी लावली होती.

यापैकी शिल्लक राहिलेल्या एका जागेवर शिंदे गटातील सदस्यांची नियुक्ती होईल अशी अपेक्षा होती. मात्र, राज्यपालांनी सदस्य नियुक्तीत भाजपला झुकतं माप दिल्याचं दिसून आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-