Top News

“उद्धव ठाकरेंना इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच”

बेळगाव | कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता कर्नाटक सरकारच्या आणखी एका मंत्र्याने एक बेताल वक्तव्य केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच आहेत. ते कन्नड भूमीतीलच आहेत, असा अजब दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले होते, असं गोविंद कार्जोळ यांनी म्हटलंय.

शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातलीच होते. पण कर्नाटकात दुष्काळ पडल्याने महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले होते, असा अजब शोध गोविंद कार्जोळ यांनी लावलाय.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा समोर आलाय, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल”

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल- अजित पवार

“अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे”

“शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत”

RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या