Biwi No: 1 सिनेमा गोविंदाने का सोडला?, 25 वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

Biwi No: 1 एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता गोविंदा सर्वच प्रेक्षकांचा लाडका होता. गोविंदाने 90 च्या दशकात त्याच्या अभिनयाने सर्वांच्याच मनावर राज्य केलं होत. अशातच आता गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकतंच सलमान खान आणि करिश्मा कपूर स्टारर असलेल्या ‘बीवी नंबर वन’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘बीवी नंबर वन’ चित्रपट गोविंदाने नाकारला :

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीवी नंबर वन’ या चित्रपटात सुष्मिता सेन आणि अनिल कपूर यांच्या देखील भूमिका होत्या. या चित्रपटाचे डेव्हिड धवनने दिग्दर्शन केले होते. ‘बीवी नंबर वन’ हा 1999 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

पण तुम्हाला माहित आहे का? ‘बीवी नंबर वन’ या चित्रपटात याआधी सलमान खान नाही तर गोविंदा मुख्य नायक होता? गोविंदासोबत डेव्हिड धवनची सुपरहिट जोडी होती. दोघांनी मिळून ‘आंटी नंबर 1’, ‘हिरो नंबर 1’, ‘जोडी नंबर 1’ आणि ‘अनारी नंबर 1’ सारखे सिनेमे केले आहेत. पण मात्र सलमान खानला ‘बीवी नंबर 1’ मध्ये कास्ट करण्यात आले होते.

Biwi No 1 l सुष्मितामुळे गोविंदाने नकार दिला :

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाने सुष्मिता सेनसोबत काम करण्यास नकार दिला होता. कारण निर्मात्यांना सुष्मिताला चित्रपटात ठेवायचे होते आणि ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मात्र त्यावेळी गोविंदाही डगमगला नाही आणि त्याने निर्माता वाशू भगनानीला या चित्रपट दिलेली रक्कम परत केली आणि चित्रपट करण्यास नकार दिला.

या विषयी गोविंदाने कारण सांगितले की, तो त्याच्या आधीच्या पात्रांसारखीच भूमिका करू शकत नाही. अनेक चित्रपटांमध्ये त्याने पत्नीची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की याआधी मनीषा कोईराला देखील करिश्मा कपूरची भूमिका साकारणार होती. पण काही कारणास्तव गोष्टी पटल्या नाहीत आणि मग करिश्माला घेण्यात आले. अन्यथा या चित्रपटातील मूळ जोडी सलमान आणि करिश्मा नसून मनीषा कोईराला आणि गोविंदाची होती.

News Title – Govinda Reject Biwi No 1 Movie

महत्त्वाच्या बातम्या-

किंग खानला हरवून दीपिका पदुकोण बनली ‘क्वीन’! पाहा IMDb Top लिस्ट

शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? तर आचार संहिता कधी लागू होणार; जाणून घ्या A टू Z माहिती

पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक व्यक्तीची एन्ट्री;…आता असं घडण्याची दाट शक्यता

मोठी बातमी! अंदाधुंद गोळीबारात माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

पुणे पोलिसांनी कॅफेवर टाकला छापा, अंधार करुन रंगला होता धक्कादायक खेळ