अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाबद्दल सर्वात मोठी अपडेट, पत्नी सुनिता आहुजा म्हणाली…

Govinda-Sunita Divorce Rumor Truth Revealed

Govinda-Sunita | बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda-Sunita) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आणि पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या अफवा जोरात सुरू होत्या. तब्बल ३७ वर्षांच्या संसारानंतर दोघे वेगळे होत असल्याच्या बातम्यांनी चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती. मात्र, या चर्चांमध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अखेर या चर्चांवर खुद्द सुनीता अहुजाने मौन सोडले असून, घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

एका मुलाखतीत सुनीता आहुजाने खुलासा केला की, ती आणि गोविंदा वेगवेगळ्या घरी राहतात. गेल्या १२ वर्षांपासून ती एकटीच वाढदिवस साजरा करत आहे, असेही तिने सांगितले. त्यामुळेच दोघांमध्ये मतभेद वाढल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच नसल्याचे तिने स्पष्ट केले.

मुंबईतील एका मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सुनीता यांना पापाराझींनी वेगळं राहण्याच्या चर्चांबाबत विचारले असता, त्यांनी त्यामागचे खरे कारण सांगितले.

“म्हणून आम्ही वेगळे राहतो, पण…”

सुनीता आहुजाने स्पष्ट सांगितले की, गोविंदा जेव्हा राजकारणात होते, तेव्हा अनेक नेते आणि पाहुणे घरात येत-जात असत. त्यावेळी आमची मुलगी टीना मोठी होत होती. त्यामुळे तिच्यासमोर बाहेरच्या लोकांशी सामना होऊ नये म्हणून आम्ही वेगळा फ्लॅट घेतला. त्या ठिकाणी गोविंदा आपल्या राजकीय आणि व्यावसायिक मीटिंग्ज करू शकत असे. मात्र, आमच्या वैवाहिक आयुष्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे तिने स्पष्ट केले.

“मला आणि गोविंदाला कोणी वेगळं करू शकत नाही. जर कोणाला तसे वाटत असेल, तर समोर यावं!” असे थेट आव्हानच सुनीता आहुजाने दिले. (Govinda-Sunita)

व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला

सुनीता आहुजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या खुलाशानंतर गोविंदाच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अनेकांनी कमेंट करत या अफवांवर टीका केली. “लोक उगाचच घटस्फोटाच्या अफवा का पसरवत होते?” असा सवाल एका चाहत्याने केला, तर दुसऱ्याने गंमतीने “मग गोविंदाच्या पायात गोळी कोणी मारली?” असा प्रश्न विचारला. (Govinda-Sunita)

या खुलाशानंतर गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात कोणताही वाद नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता घटस्फोटाच्या अफवा थांबतील, अशी अपेक्षा आहे.

Title : Govinda-Sunita Divorce Rumor Truth Revealed

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .