“मला गोविंदासोबत मज्जा यायची पण…”, पत्नी सुनिताने केला गौप्यस्फोट!

Govinda-Sunita Divorce Rumors Truth Revealed

Govinda-Sunita Divorce | बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा (Govinda-Sunita Divorce) चित्रपटांपासून दूर असला तरी, तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या त्याच्याबद्दल एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) 37 वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याच्या विचारात आहेत. या वृत्तामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

गोविंदा-सुनीता घटस्फोट घेणार?

गोविंदा आणि सुनीता आहुजा लवकरच घटस्फोट घेऊ शकतात. काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की गोविंदाचे एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे तो पत्नीपासून वेगळा होण्याचा विचार करत आहे. मात्र, या मराठी अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. घटस्फोटाबाबत अद्याप गोविंदा किंवा सुनीता यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीत, सुनीता आहुजा यांनी स्पष्ट केले होते की त्या आणि गोविंदा वेगळे राहतात. आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही. मला त्यांच्यासोबत खूप मजा येते. काही लोक घर तोडण्याचा प्रयत्न करतात, पण मी कोणालाही घर तोडू देणार नाही. मात्र, त्या म्हणाल्या की आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही. तसेच, “काही लोक आमचं घर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी असं होऊ देणार नाही,” असेही त्या म्हणाल्या होत्या.

गोविंदाचे विवाहबाह्य संबंध?

गोविंदाचे एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. सुनीता यांनीही त्यांच्या अलीकडील मुलाखतीत अप्रत्यक्षरित्या याबद्दल संकेत दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की दोघांचे वेळापत्रक जुळत नसल्याने ते वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात.

याशिवाय, एका मुलाखतीत सुनीता यांनी महिलांना सल्ला देताना म्हटले होते की, “तुमच्या नवऱ्यांची काळजी घ्या. पुरुष क्रिकेटसारखे असतात – कधी चांगले, कधी वाईट. जर ते नियंत्रणाबाहेर जात असतील, तर त्यांना थप्पड मारा!” त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात केली होती.

गोविंदा आणि सुनीता यांचा विवाह

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा विवाह 1987 मध्ये झाला होता. त्यावेळी सुनीता फक्त 18 वर्षांची होती. दोघांना टीना (Tina) आणि यशवर्धन (Yashvardhan) ही दोन मुले आहेत. त्यांच्या नात्यातील बिघाडाच्या चर्चांनी आता वेग घेतला आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Govinda-Sunita Divorce)

Title: Govinda-Sunita Divorce Rumors Truth Revealed

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .