“माझ्या पतीकडे रोमान्ससाठी…”, गोविंदाच्या पत्नीनं बेडरुममधलं सगळंच सांगून टाकलं

govinda

Govinda | बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात अपार यश मिळवलेल्या अभिनेता गोविंदा (Govinda) यांचे करिअर जसे अधोगतीला गेले, तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकेकाळी सलमान (Salman Khan), शाहरुख (Shah Rukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांच्या ब्लॉकबस्टर फिल्म्सनाही मागे टाकणाऱ्या गोविंदाचा सिनेकरिअर आता जवळपास संपुष्टात आला आहे. सध्या ते आपल्या पती-पत्नीच्या नात्यातील तणावामुळे चर्चेत आहेत.

गोविंदा आणि सुनीता यांच्या 37 वर्षांच्या लग्नाचा अंत?

गोविंदा (Govinda) आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. काही अहवालांनुसार, त्यांच्या 37 वर्षांच्या वैवाहिक जीवनाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गोविंदाचे नाव एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी जोडले जात आहे. मात्र, या चर्चांवर गोविंदा आणि सुनीता यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

सुनीता यांनी व्यक्त केला होता संताप

सुनीता आहूजा आपल्या बिनधास्त बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाच्या (Govinda) वैयक्तिक आयुष्याविषयी थेटपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुनीता यांनी म्हटले होते की, “माझ्या पतीकडे रोमान्ससाठी वेळ नाही. मी मुलांसोबत वेगळी राहते. मला पुढच्या जन्मी असा नवरा नको, जो सुट्टीसाठी, गोलगप्पे खाण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी वेळ देऊ शकत नाही.”

एका पोस्टनुसार, गोविंदा आणि सुनीता यांच्यात दुरावा वाढला आहे आणि आता त्यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जात आहे. काही मुलाखतींमध्ये सुनीता यांनी इशारा दिला होता की, गोविंदाचा कोणाशी तरी अफेअर सुरू आहे. याशिवाय, दोघेही एकाच घरात राहूनही एकमेकांपासून वेगळे आहेत, कारण त्यांचे वेळापत्रक जुळत नाही.

गोविंदा परफेक्ट नवरा नाही?

सुनीता यांनी गोविंदाला नेहमीच “नेक आणि जबाबदार माणूस” म्हणून संबोधले आहे. त्या म्हणतात, “प्रत्येक आईला गोविंदासारखा मुलगा मिळावा.” मात्र, त्या त्यांना परफेक्ट नवरा मानत नाहीत, कारण ते कामात इतके व्यस्त असतात की वैवाहिक जीवनाकडे पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.

News Title : Govinda-Sunita Divorce What’s the Truth?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .