Sunita Ahuja | बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा (Govinda) गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो सतत चर्चेत असतो. सध्या त्याच्या आणि पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) यांच्यातील मतभेदांबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत, त्यामुळेच त्याच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला आहे. या चर्चांदरम्यान, सुनीता अहुजाच्या (Sunita Ahuja) एका मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तिने आपल्या सासरच्या लोकांबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
सुनीता अहुजाने सासरच्या कुटुंबावर दिलेलं वक्तव्य
एका जुन्या मुलाखतीत सुनीता अहुजाने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि सासरच्या कुटुंबाबाबत भाष्य केले होते. तिने सांगितले की, “मी जेव्हा गोविंदासोबत लग्न केलं, तेव्हा त्याचं कुटुंब मोठं होतं. मी १८व्या वर्षी विवाह केला आणि १९व्या वर्षी आई झाले. मी स्वतः लहान होते, पण गोविंदावर प्रचंड प्रेम केलं. लग्नाच्या आधीच त्याने मला सांगितलं होतं की, तोपर्यंत माझ्या आईचेच सर्व काही चालेल, जोपर्यंत ती जिवंत आहे. तिच्या पश्चात मात्र तुझ्या इच्छेनुसार घरात गोष्टी होतील.”
सुनीताने पुढे सांगितले, “कृष्णा (Krushna Abhishek) आणि विनय लहान होते, मला लहान मुलं खूप आवडतात. पण मी माझ्या मनाला येईल तसं काहीही करू शकले असते, असं नाही. मी कधी कोणाला घरातून बाहेर काढण्याचा विचारही केला नाही. कारण, मी जे चांगलं केलं, त्याचं फळ देव नक्कीच देईल. मुलांनी हे ओळखलं नाही तरी देव सगळं बघत असतो. माझ्या नवऱ्यावर मी इतकं प्रेम करत होते की, मी हे सर्व सहन केलं.”
घटस्फोटाच्या चर्चांवर सुनीताची प्रतिक्रिया
सध्या गोविंदा आणि सुनीता यांच्यातील मतभेद वाढल्याच्या चर्चांना वेग आला आहे. सुनीताने घटस्फोटाच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली नसली, तरी काही महिन्यांपूर्वी तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती आणि गोविंदा सध्या वेगळे राहत आहेत. या मुलाखतींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही, मात्र त्याच्या वैवाहिक आयुष्यातील तणावामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (Sunita Ahuja)
Title: Govindas Marriage in Trouble Sunita Ahuja Statement Goes Viral
“माझी छाती तिच्याएवढी…”, स्वतःच्या ब्रेस्टबद्दल नीना गुप्ता हे काय बोलून गेल्या?