पुणे | 4 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही, अशा शब्दात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
पुण्यात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. यावेळी गोविंदगिरी महाराज बोलत होते.
छपत्रतींच्या प्रतिमेचा काहींनी मेकअप केलाय. तर काहींची मुळ प्रेरणा आहे. राजनीतीचं हिंदूकरण आणि हिंदूचं सैनिकीकरणाची प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आहे, असं देखील गोविंदगिरी महाराज म्हणाले.
राम मंदिराचा संघर्ष हा रोमांचक आहे. संन्याशांनी, नागा साधू आणि तीन लाख लोकांनी बलिदान दिलं आहे. राम हा देशाचा कस आणि बळ आहे. जोपर्यंत रामाचं चिंतन आहे, तोपर्यंत हा देश बलवान आहे, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं”
“मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा अनेकांनी विडाच उचलला होता, पण…”
खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार
जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले
‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र