पुणे | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आमदार होणं अधिकृतरित्या लांबलं आहे. निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं उलथापलथ होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडल जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील विधानपरिषदेतील 8 जागा 24 एप्रिल 2020 राजी रिक्त होणार आहेत. या जागांवर निवडणूक वेळेत होणार नसल्याचं निवडणुक आयोगाने स्पष्ट केलं आहे. बिहारमधील नऊ आणि महाराष्ट्रातील निवृत्त होणाऱ्या 8 आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायची अशी एकूण 9 जागांवरीवल निवडणूक पुढे गेली आहे. यासंदर्भातील आदेश 3 एप्रिल 2020ला जारी करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या आद्शानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005च्या कमल 10 (2) (1) अंतर्गत सार्वजनिक देखरेखीसाठी बंदी घालणं आणि जमा करणे यासह विस्तृत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्याप्रमाणे निवडणुका घेणं शक्य नसल्याचं, निवडणुक आयोगानं सांगितलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ 28 नोव्हेंबर रोजी घेतली होती. ठाकरे यांना सहा महिन्यांत विधिमंडळाचे सदस्य होणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे 27 मेपूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक ठरतं.
ट्रेंडिंग बातम्या-
“निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?”
‘देशात सध्या लॉकडाऊन पण नंतर आम्ही आहोतच’; राज ठाकरे यांचा विकृतांना इशारा
महत्वाच्या बातम्या-
“मोदीजी, पहिलं देशातील गद्दारांवर सर्जिकल स्टाइक करा”
मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे- राज ठाकरे
देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली
Comments are closed.