कन्हैय्या कुमार आणि उमर खालिदला सरकार घाबरलं- जितेंद्र आव्हाड

मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशद्रोहाच्या खटल्यात कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं गेलं यातून हे सरकार त्या दोघांना घाबरलं आहे हे स्पष्ट होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

सरकारनं काहीही केलं तरी भारतातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढतच राहील, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

कन्हैया कुमारसह आणखी 10 जणांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज पटियाला हाऊस कोर्टात देशद्रोहाच्या खटल्यात आरोपपत्र दाखल केले आहे.

दरम्यान, जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 9 फेब्रुवारी 2016 रोजी कथित देशविरोधी घोषणा दिल्याचं प्रकरण घडलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-आता व्हॉट्स अ‌ॅपवरही शेड्युल करता येणार मेसेज

-विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

-“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”

-संजय काकडे-अशोक चव्हाण यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

-कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहापकरणी आरोपपत्र दाखल