ब्रिटनच्या धर्तीवर भारतातही ऑनलाईन बेटिंग अधिकृत होणार

विजय गोल, केंद्रीय क्रीडा मंत्री

नवी दिल्ली | ब्रिटनच्या धर्तीवर ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी भारताच्या क्रीडा मंत्रालयाने हालचाली सुरु केल्यात. क्रीडा सचिव इनजेटी श्रीनिवास सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असून ते यासंदर्भात ब्रिटनशी सामंजस्य करार करण्याची शक्यता आहे.

भारतात ९.६ लाख कोटी रुपयांचं अनधिकृत बेटिंग मार्केट आहे. बेटिंग अधिकृत झाल्यास सरकारला कररुपाने मोठा फायदा होईल.

दरम्यान, भारतात सध्या फक्त घोड्यांच्या शर्यतींवर बेटिंग लावण्यास अधिकृत मान्यता आहे. जीएसटीत या शर्यतींवर तब्बल २८ टक्के कर आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या