Top News

कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा; मोदी सरकारने केली ही मोठी घोषणा

Loading...

नवी दिल्ली | देशभरात लॉकडाऊनमुळे सर्व सेवा-उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सरकारकडून योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकार पुढील तीन महिन्यांसाठी विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यांमध्ये पैसे भरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत घेऊन याची घोषणा केली.

Loading...

ज्या कंपन्या अथवा संस्थांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत. तसेच या कंपन्या अथवा संस्थांमधील 90 टक्के कर्मचारी हे 15 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन घेतात अशा कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी कर्मचारी आणि कंपनी यांच्याकडून येणारे प्रत्येकी 12 टक्के याप्रमाणे 24 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून जमा केली जाणार आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

वाह दादा वाह! गोर-गरीब गरजुंसाठी गांगुलीकडून 50 लाखांची मदत

लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार- निर्मला सीतारामन

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या