बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर विराट कोहलीला गमवावं लागू शकतं कर्णधारपद!

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिले 2 सामने गमावल्याने भारताला मालिका गमवावी लागलीय. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर टीका सुरु असताना आता द.आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रँम स्मिथनेही कोहलीला लक्ष्य केलंय. 

कोहलीला नवीन संकल्पना सुचवणाऱ्या आणि लीडरशीपसाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्याची आवश्यकता आहे, अन्यथा कोहली जास्त दिवस कर्णधारपदावर राहणार नाही, असं स्मिथनं म्हटलंय. 

कोहलीच्या आक्रमकतेमुळे त्याचा खेळ बहरतोय, मात्र तो संघाचं नुकसान करतोय. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतर खेळाडूंना संघर्ष करावा लागतोय, असंही स्मिथनं म्हटलंय. 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More