मुंबई | ग्रामपंचायत निवडणुक लढवताना उमेदवारांना अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं असतं. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र हे उमेदवारांना देणं महत्वाचं असतं. मात्र आता ग्रामपंचायत निवडणूक लढवताना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. याबबातचं विधेयक विधीमंडळात मंजूर करण्यात आलं आहे.
निवडून आल्यावर एक वर्षानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणूक लविणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जात पडताळणी करणं खूपच धावपळीचं ठरत होतं. तसेच उमेदवारी अर्जबाद होत होता. त्यामुळे आता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला वर्षभरात हे प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ मिळणार आहे.
उमेदवाराला निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यामुळे राज्यातल्या पंधराशे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्यांना राखीव जागांवरच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारने बदलुन पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवड करण्याचा आमलात आणला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“…तर ज्योतिरादित्य शिंदेंसारखा नेता भाजपमध्ये गेला नसता”
कोरोनाचं नाव पुढं करून राज्य सरकार लोकांना घाबरवत आहे- राज ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
“महाविकास आघाडी अभेद्य, उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या वऱ्हाडी मंडळींनी लक्षात ठेवावं”
ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपप्रवेशावर सचिन पायलट यांनी मौन सोडलं; म्हणाले…
17 दिवसांच्या चिमुरडीने कोरोनावर केली मात
Comments are closed.