Top News पुणे महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुका घोषित; 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान

पुणे | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली आहे. 15 जानेवारी 2021 रोजी  34 जिह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त यु.पी.एस मदान यांनी केली. तसेच निवडणूक रद्द झालेल्या या ग्रामपंचायतींसह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या निवडणुकांसाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहे. मात्र शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या