Top News महाराष्ट्र मुंबई

‘घासून नाय, तर विरोधकांची ठासून’! मनसेने सेना-भाजप युतीला धूळ चारत ‘या’ ग्रामपंचायतीवर लावली विजयाची पताका

मुंबई | ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली होती. मनसेने सेना-भाजप युतील धूळ चारत काकोळी ग्रामपंचायतीवर विजयाची पताका लावली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. काकोळी ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली. यात मनसेनं युतीच्या उमेदवारांचा पराभव करत ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे.

आपले ‘मनसे’ अभिनंदन! घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील 07 पैकी 04 सदस्य विजयी!, अशा शब्दात मनसेने सदस्यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान,  ग्रामपंचायतीत मनसेचा नगरसेवक विराजमान होणार असून 7 पैकी 4 जागा पक्षानं जिंकल्या आहेत. सर्व विजय उमेदवारांचं पक्षाच्या वतीनं अभिनंदनही करण्यात आलं आहे. आत्ता पर्यंत हाती आलेल्या निकालांपैकी मनसेने 11 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे

थोडक्यात बातम्या-

माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे- उद्धव ठाकरे

मित्रांच्या कर्जमाफीनंतर मोदी सरकारचा आता शेतकऱ्यांच्या पैशांवर डोळा- राहुल गांधी

जनतेचा महाविकास आघाडीवर ठाम विश्वास- आदित्य ठाकरे

चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केली आघाडी तरीही सेनेने भगवा फडकलाच

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या