थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड, सातवी पास असणं बंधनकारक

मुंबई | खेडी सक्षम करण्यासाठी ग्रामसभेचे अधिकार वाढवण्यात आले असून नगराध्यक्षानंतर आता सरपंचाची निवडही थेट जनतेतून होणार आहे. तसेच १९९५ नंतरचा जन्म असेल तर सरपंच होण्यासाठी सातवी पास असणं बंधनकारक असेल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. 

ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्थांना फक्त पंच निवडण्याचा अधिकार असायचा. हेच पंच आपल्यातून एकाला सरपंच म्हणून निवडायचे. मात्र नव्या पद्धतीमुळे ही पद्धत बंद होणार आहे. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

Comments are closed.