Red Fort Lal killa - लाल किल्ल्याच्या परिसरात ग्रेनेड सापडल्याने दिल्लीत खळबळ
- देश

लाल किल्ल्याच्या परिसरात ग्रेनेड सापडल्याने दिल्लीत खळबळ

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमध्ये कुख्यात दहशतवादी शिरल्याची माहिती असतानाच लाल किल्ल्याजवळ ग्रेनेड सापडले आहेत. सुदैवाने हा ग्रेनेड निकामी होता. मात्र या प्रकारामुळे राजधानी दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.

ग्रेनेडबद्दल माहिती मिळताच एनएसजीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रेनेड ताब्यात घेतलं. हे ग्रेनेड कुणी लाल किल्ल्याच्या परिसरात टाकलं, याचा तपास करण्यात येत आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा